साप आणि शेतकरी

एका शेतकऱ्याच्या शेतात एका बिळात साप राहत असे.
शेतकऱ्याने त्या सापाला घालवायचा प्रयत्न केला नाही.
दोघेही शांतिपूर्वक शेतात वावरत असत.
एकदा चुकून शेतकऱ्याच्या मुलाचा सापावर पाय पडला आणि सापाने पटकन त्याला चावले.
दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला.
शेतकऱ्याचा राग अनावर झाला.
तो कुऱ्हाड घेऊन सापाच्या मागे लागला आणि वार करत सुटला.
सापाने काही वार चुकवले पण शेवटी एक वार बसला आणि सापाची शेपूट तुटली.
शेतकरी थकुन निघुन गेला.
काही दिवसांनी शेतकऱ्याने सापाशी मैत्री करून पुन्हा शांतता आणण्याचा प्रयत्न केला.
साप त्याला म्हणाला “आता आपली मैत्री शक्य नाही. कारण आपल्या दोघांकडुन एकमेकांना फार मोठी हानी झाली आहे. ती आपण विसरणं शक्य नाही.”