मराठी गोष्टी

अज्ञाताचे भय

अज्ञाताचे भय

एका कोल्ह्याने आजवर सिंह पाहिलेला नव्हता. 

पहिल्यांदा त्याने सिंहासारखा प्रचंड आकाराचा शक्तिशाली प्राणी पाहिला तेव्हा त्याची भीतीने गाळणच उडाली. सिंहाला दुरूनच पाहुन त्याने धुम ठोकली. 

पुढच्या वेळेस त्याने सिंह पाहिला तेव्हा त्याने जरा धीर धरला. एका झाडामागे लपुन त्याने सिंहाचे निरीक्षण केले. 

त्याच्या पुढच्या वेळेस मात्र त्याचे जरा धाडस वाढले. पुन्हा सिंहाला बघितल्यावर त्याने पुढे होऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत मैत्री केली. 

आपण आपल्याला अनोळखी गोष्टींनाच जास्त घाबरत असतो.